Breaking News

मांढरदेवी यात्रेसाठी जाणा-या भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय.


पुणे, दि. 30, डिसेंबर - पौष पोर्णिमेनिमित्त मांढरदेवी येथे 31 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान भरणा-या यात्रेसाठी जाणा-या भाविकांच्या सोईसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून जादा एसटींची सोय केली आहे. पुणे जिल्ह्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, सासवड, दौंड, भोर, नारायणगाव, इंदापूर, शिरूर, बारामती, राजगुरुनगर, तळेगाव या आगारातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या यात्रेसाठी पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने जात असतात. त्यांच्या सोईसाठीच या जादा गोड्या सोडण्यात येणार आहेत,अशी माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली. अधिकाधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी केले आहे.