Breaking News

आयपीएलचे सामने आंठ एवजी सात वाजता सुरू होणार?

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या इंडियन प्रीमियर लीगने गेल्या दहा वर्षांत अफाट लेाकप्रियता मिळवली असून या लीगमुळे अनेक स्थानिक क्रिकेटपटू लक्षाधीश बनले आहेत. दिव्यांच्या प्रकाशझोतात रंगीबेरंगी पोशाखात आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी क्रिकेटशौकीन स्टेडियमवर एकच गर्दी करतात.

हे सामने पाहण्यासाठी दूरवरून लहान-मोठ्या वयाचे प्रेक्षक येत असतात. सामन्याचा आनंद लुटल्यावर घरी परतताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक होते. ही परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील वर्षातील आयपीएलचे सामने रात्रौ आठ ऐवजी सात वाजता सुरू होण्याचा प्रस्ताव पुढे आला असून या स्पर्धेतील संघमालकांनीही या सुधारित वेळेला मान्यता दर्शवली आहे..