वाहनाला दिलेल्या धडकेत एक ठार.
मुंबई : ओव्हरटेक करताना ट्रेलरने मनपाच्या क्लीनअप वाहनाला दिलेल्या धडकेत क्लिनअप वाहनातील एकजण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हुसेन रिजवान शेख (२०) असे त्याचे नाव आहे.
बैंगणवाडी, डम्पिंग ग्राऊंड, बिलाल मशीदजवळ राहणारे मकसूद आलम शेख (२५) आणि त्याचा मित्र हुसेन रिजवान शेख (२०) हे महानगरपालिकेच्या क्लीनअप वाहनाने सोमवारी सायंकाळी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने बैंगणवाडीकडे जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने ओव्हरटेक करण्याच्या नादात क्लीनअपला धडक दिली. यात हुसेन हा गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयायात उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी चालक घटनास्थळावरून फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.