Breaking News

पृथ्वीराज चव्हाण हे निर्णय क्षमता नसलेले मुख्यमंत्री होते : नारायण राणे

कराड : पृथ्वीराज चव्हाण हे निर्णय क्षमता नसलेले मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्री काळातील पहिल्या सहा महिन्यात त्यांना शेजारी बसुन मीच राज्यकारभार शिकवीला म्हणुन ते  राज्यकारभार चालवु शकले  अशी खिल्ली माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची  नारायण राणे यांनी उडवली. नारायण राणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते. त्यांनी येथील यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


राणे पुढे म्हणाले मी सेनेत असताना स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांचा मी  सर्वात आवडता शिवसैनिक होतो. त्यांनी नगरसेवकापासुन मुख्यमंष्यापर्यंतच्या जबाबदार्‍या माझ्यावर सोपवल्या त्या मी यशस्वी रित्या पार पाडल्या परंतु त्यांचे चिरंजीव  उध्दव ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष झाले त्यावेळेस आमच्या दोघांंचे  वैचारिक मतभेद निर्माण झाले. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरेना त्रास होत होता. तो मला सहन झाला नाही म्हणुन मी पक्षाला राजीनामा दिला. 

आज उध्दव ठाकरे यांची सत्तेत असुनही केवलवानी परिस्थिती आहे. भाजपकडुन अपमानास्पद वागणूक मिळणुनही सत्तेत राहण्याची त्यांनी लाचारी पत्करली आहे. मी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देवुन महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष्याची स्थापना केली आहे. या पक्ष्याच्या माध्यमातुंन भविष्यात श्री.छ.शिवाजी  महाराज यांच्या स्वप्नातील लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करेन.यावेळी मा.खा.नितेश राणे , संग्राम महाडिक, शैलेश शेवाळे, यांची  उपस्थिती होती.