Breaking News

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

बंगळूर/वृत्तसंस्था : पत्रकार गौरी लंकेश हत्ये प्रकरणी एसआयटीच्या टीमने दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुपारी किलर शशीधर आणि त्याला शस्त्र पुरवठा करणारा ताहीर नावाचा व्यक्ती सहभागी आहे. एसआयटी दोघांचीही कसून चौकशी करत आहे. 


शशीधर आणि ताहीरकडून 7.65 एम एम बोरची गावठी बंदूक जप्त करण्यात आलीये. अशाच एका बंदुकीतून गौरी लंकेश आणि एम.एस.कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. ऑगस्ट 2015 मध्ये कलबुर्गी यांची दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तशाच प्रकारे 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. 

कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी या बातमीला दुजोरा दिला. गौरा लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. एसआयटी आणि सीसीबी टीम दोघांची चौकशी करत आहे. आम्ही बॅलेस्टिक रिपोर्टसची वाट पाहतोय तो आल्यानंतर त्यावर निष्कर्ष योग्य तो निष्कर्ष काढला जाईल असेही रेड्डी यांनी सांगितले.