Breaking News

रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात नागरिकांचे उपोषण सुरु

कुकाणा/ प्रतिनिधि / -बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी शुक्रवार १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुकाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात अमरण उपोषणाचा एल्गार पुकारला असून या उपोषणास नेवासा-शेवगाव तालुक्यासह परिसरातील अनेक संघटना व ग्रामपंचायतचा पाठींबा जाहिर केला. 

दिवसभर या ठिकाणी नागरिकांची गर्दी होती. याबाबतची माहिती अशी कि ब्रिटिशानी सन १९२२ मधे वरील रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन भूमी अधिग्रहण करून माती भराव पूर्ण केला होता. संपादित जमिनीचा मोबदला ब्रिटिशानी  दिल्याने ७/१२ उताऱ्यावर रेल्वे ची नोंद करण्यात आली. वरील लोह मार्गाचा सर्वे बेलापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी,राजुरी, रायमोह, बीड ,असा चुकीचा करून तो न परवडणारा असल्याचा सर्वे रिपोर्ट सादर झाल्याने मूळ रेल्वे मार्ग मागे पडला आहे.


 या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वसाठी बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्था गेली 8-१० वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. परंतु या मार्गाचे काम सुरु होत नसल्याने कुकाणा परिसरातील तसेच तालुक्यातील नागरिकांनी अामरण उपोषण चालू केले आहे, या उपोषणाला परीसरातून अनेक संघटनाचा पाठींबा मिळाला आहे.


या उपोषणाला रितेश भंडारी, सुरेश नरवणे, कारभारी गरड, प्रकाश देशमुख, निसार सय्यद, महेश पुंड, आदि अमरण उपोषण करणार आहेत तसेच या उपोषणाला शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अंबादास कोरडे ज्ञानेश्वर कारखान्याचे जेष्ठ संचालक देसाई देशमुख भेंडा खु.चे सरपंच सुनील खरात बुद्रुक चे संगीता गव्हाणे क्रांतिकारी चे जेष्ठ नेते भैयासाहेब देशमुख, जि .प .सदस्य दत्तात्रय काळे , कुकाण्याचे माजी सरपंच अरुणकुमार देशमुख , दौलत देशमुख , प्रा.मछिंद्र भोसले , भारत गरड , युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश कर्डिले अँड . गणेश निकम माजी उपसरपंच राजेंद्र चाबुकस्वार मुसा इनामदार माजी उपसभापती अशोक मंडलिक सलीम इनामदार, नामदेवराव उंडे, संजय भंडारी, अशोक गांधी, दिलीप बाफना, प्रवीण चोरबेले, शंकर भारस्कर, लहूजी सेनेचे भैरवनाथ भारस्कर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ कचरे, यशवंत एरंडे, गणेश मोढवे, विशाल निकम , रज्जाक इनामदार, अजित मुनोत, लतिफ शेख ,आदी नागरिकांनी या उपोषणाला भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.

मुख्यमंत्री साहेबाची रेल्वे क्रुती समितीची भेट घेऊन राज्य सरकार चे केंद्र सरकार ला बेलपुर- परळी रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील असल्याचे मागणी पत्र देण्याचे आश्वासन आमदार बाळासाहेब मूरकुटें यांनी दिले . आमदार मूरकुटें यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही देऊन कुकाणा येथे नागरिकांचे चालू असलेले उपोषण ला भेट दिली. हा महत्वाचा प्रश्न मुख्यमंत्री महोदय समवेत बैठक घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री कार्यालयत पाठपुरवा करण्याबाबत मदत करू व लोकांच्या नागरीकांच्या जनतेच्या या महत्वाच्या प्रश्नी लक्ष घालतो. असे आश्वासन आमदार मूरकुटे दिले