Breaking News

जिल्हा रुग्णालयातील अनधिकृत बांधकाम पाडले

जळगाव, दि. 17, डिसेंबर - जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील जागेवर कर्मचा-यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासांमध्ये अतिरिक्त बांधकाम करुन अतिक्रमण करण्यात आले होते. तसेच निवृत्त झाल्यानंतरही काही कर्मचा-यांनी निवास स्थान खाली केलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. 


त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आज जेसीबीच्या सहाय्याने सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात शासनाने वर्ग 2, 3 व 4 च्या कर्मचार्यांसाठी निवास स्थाने बांधून दिले होते. परंतु यातील काही कर्मचार्यांनी या निवास स्थानांमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करुन अतिक्रमण केले होते. दरम्यान जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता. त्यांना कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तसेच या रुग्णालयातून निवृत्त झालेल्या काही कर्मचार्यांनी देखील निवास स्थाने खाली करुन न दिल्यामुळे त्यांना देखील घरे खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सक ाळी 10 वाजेपासून जिल्हा रुग्णालयात अतिरीक्त शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णालयातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.