मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर अपघात : एक ठार; चार गंभीर जखमी
कर्जत / मुंबई, दि. 11, डिसेंबर - मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर चारचाकी गाडीला झालेल्या भीषण अपघातात ज्ञानेश्वर केणे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुण्याहून मुंबईकडे येत असलेल्या मार्गावर खालापूर पोलीस ठाण्यानजीक हा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुण्याहून मुंबईकडे येत असलेल्या मार्गावर खालापूर पोलीस ठाण्यानजीक हा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.