Breaking News

भाजपा नगरसेवकाला पोलीस निरीक्षकाची शिवीगाळ ; तात्काळ निलंबीत करण्याची मागणी .


शेवगाव/प्रतिनीधी/- भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक अशोक आहूजा यांना शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाकडून आर्वाच्य भाषेत झालेल्या शिवीगाळ प्रकऱणी त्यांची चौकशी करुन त्यांना तात्काळ निलंबीत करावे. अशी मागणी शेवगाव तालुका भाजपा पदाधिका-यांनी व विविध नागरी संघटनांनी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरसेवक आहूजा हे शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी शेवगाव शहरातील वाढलेले चो-यांचे प्रमाण व त्यासाठी गस्त घालणा-या नागरीक व कार्यकर्त्यांची यादी देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, त्या ठिकाणी शहरातील दोन व्यक्तींची कडाक्याचे भांडण सुरु होते.ते सोडवण्यासाठी आहूजा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता. 

त्याचा राग पोलीस निरीक्षक ओमासे यांना येवून आहुजा यांची शर्टची कॉलर पकडुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.त्यांना गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकण्याची दमदाटी केली. आहुजा हे मागील ३० वर्षापासुन स्थानिक राजकारणात विविध पदावर कार्यरत आहेत. लोकप्रतिनिधींना उर्मट वागणुक देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करावे. अन्यथा सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी शेवगाव शहर बंद ठेवण्याचा व अन्य ठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.