Breaking News

मरोळ येथे बेस्ट बस डंपरला जावून धडकली; 12 जखमी


मुंबई, दि. 25, डिसेंंबर - मरोळ येथे बेस्ट बस डंपरला जावून धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जोगेश्‍वरीमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.ऐरोलीहून अंधेरीच्या दिशेने जाणा-या बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस डंपरला जावून धडकली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.