Breaking News

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मानधनात घसघशीत वाढ

मुंबई : पुढील वर्षातील आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मानधनात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडेच आयपीएलची प्रशासकीय समिती आणि स्पर्धेतील संघ मालकांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

संघ मालकांना खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या रकमेत तब्बल वीस टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रत्येक मालक संघ खेळाडूंना यंदा १२ दशलक्ष डॉलर्सची (अंदाजे ८५ कोटी रुपये) मर्यादा घालण्यात आली आहे.

पुढील तीन वर्षांसाठी मालक संघ आधीच्या संघातील पाच खेळाडूंना आपल्याकडे ठेवू शकतील. यासाठी दोन पर्याय आहेत. पाचपैकी तीन खेळाडूंना राखत उर्वरित दोन खेळाडू ते विशेष हक्काने मिळवू शकतात. खेळाडूंना राखून ठेवण्याबाबत बीसीसीआयने एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.