Breaking News

पुण्यात आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला आग, रोकड जळून खाक

पुणे, दि. 02, नोव्हेंबर - शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला मध्यरात्री आग लागली. आगीमध्ये एटीएममधील पूर्ण रक्कम जळून खाक झाली आहे. पुण्यातील वारजे गणेश माथ्याजवळ गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.


प्रथम या परिसरामधील एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आणि थोड्याच वेळात दुकानातच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमनेही पेट घेतला. यामुळे एटीएममधील लाखो रुपयांची रक्कम जळून खाक झाली. रकमेचा आकडा मात्र अद्याप समजू शकलेला नाही. गुरुवारीच या एटीएममध्ये पैसे भरले होते. एका आठवड्यातच पुण्यामध्ये ही दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी सहकारनगरमधील जनता सहकारी बँकेच्या एटीएमला आग लागून सर्व रोकड खाक झाली होती.