Breaking News

मोरवाडीत पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती

पुणे, दि. 02, नोव्हेंबर - जागतिक एड्स दिनानिमित्त मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात शुक्रवारी (दि.1) पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच परिसरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. मोरवाडी प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पथनाट्य आणि एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात एड्स जनजागृती रॅली काढली. ’’याद रखे..सुरक्षा जीवन का अर्थ है’, सुरक्षा के बीना सब व्यर्थ है’’, ’’कखत असे जेथे, जीवनाचा नाश तेथे’’, ’’एड्स दिवस पर खाओ कसम, सुरक्षित बनाएँ यौन संबध’’, ’’जो सुरक्षा से दोस्ती तोडेंगे...वह एक दिन दुनिया भी छोडेंगे’’, ’’यौन संबंध जब-जब कंडोम तब-तब’’, ’’एड्स आजाराचा द्वेष करा, एड्स झालेल्या व्यक्तीचा नको’’, ’’सुरक्षित रहा, सतर्क रहा...तुमच्यासाठी, समाजासाठी’’, ’’विवाह में रहे वफादार, तब एचआयव्ही, एड्स के कभी न होंगे शिकार’’,’’सही और पूर्ण जानकारी..दूर रखें एड्स की बिमारी’’, ’’कंडोमचा वापर करा, एड्स टाळा’’ अशा संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेतले होते. 

रॅलीनंतर लालटोपीनगर मध्ये पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून एड्स कसा होता, कोणाला होतो. त्याची माहिती दिली. सोबत राहिल्यावर, हात मिळविल्यावर, एका ताटात जेवल्यावर एड्स होत नाही. त्यामुळे एड्स झालेल्या व्यक्तीचा मत्सर करु नये, असा संदेश दिला. असुरक्षित लैंगिक संबंध, दू षित रक्ताद्वारे, दूषित रक्त असलेल्या इंजेक्शन सुई वापरल्याने, आईकडून बाळाला किंवा स्तनपानाद्वारे आणि टॅटू काढताना जर ते साहित्य दूषित असेल तर त्यातूनही एड्स होऊ शकतो, अशी माहितीही विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिली.यावेळी बोलताना नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या की, एड्स झालेल्या रुग्णांचा द्वेष करू नये. 

एड्स झालेले लोक तणावात असतात. त्यांची हेळसांड, तिरस्कार करू नये. तुसड्यासारखी वागणूक देऊ नये. सोबत राहिल्यामुळे, जेवल्यामुळे किंवा हातात-हात मिसळल्यामुळे एड्स होत नाही. परंतु, त्याचा गैरप्रचार करण्यात येत आहे. झोपडपट्टी परिसरात एड्सची जनजागृती करणे गरजेचे आहे. या परिसरातील लोकांना त्याबाबत जास्त माहिती नसते. त्यामुळे या प रिसरात एड्सची पथनाट्यातून माहिती देण्यात आली. तसेच जनजागृती करण्यात आली.