Breaking News

जयपूरच्या रामगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू

जयपूर, दि. 10, सप्टेंबर - जयपूरच्या रामगंज येथे पोलीस ठाणे क्षेत्रात शुक्रवारी रात्री उशिरा उसळलेल्या हिंसाचारानंतर रामगंजसह चार भागात संचारबंदी लागू  करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांमध्ये शुक्रवारी हाणामारी झाली होती. त्यात एका पोलीस कर्मचा-याचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले  आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रामगंजमध्ये एका कारवाई दरम्यान पोलिसांची काठी एका जोडप्याला लागल्याने हिंसाचारास सुरूवात झाली. त्यावेळी नागरिकांनी  काही वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली. जमावाने पॉवर हाऊसलाही आग लावली. त्यानंतर येथे मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. आलन-फालनमध्ये  जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रु धुराच्या नळकाड्यांचाही वापर पोलिसांनी केला. पोलीस आयुक्तांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.