Breaking News

अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा


नवी दिल्ली : पटियाला हाऊस कोर्टने अंडरवल्ड डॉन अबू सालेमला 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशोक गुप्ता या व्यापर्‍याकडून 5 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी शिक्षा सुनावली गेली आहे. मागील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अबू सालेमला दोषी ठरवले होतं, पण त्याच्या शिक्षेचा निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता. एप्रिल 2002 साली अबू सालेमने मला खंडणीसाठी बोलावलं असल्याची कबूली अशोक गुप्ताने न्यायालयात दिली होती. दरम्यान, मी त्याला 5 कोटी रूपये नाही दिले तर मला आणि माझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी अबूने दिली होती.