विवेकानंद गुरुकूंज मध्ये गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत
बुलडाणा, दि. 30 - स्थानिक विवेकानंद गुरुकुंज सेमी इंग्रजी व मराठी प्राथमिक शाळा येथे नविन शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस म्हणून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक गजानन इंगळे हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. प्रार्थना झाल्यानंतर सर्व शिक्षा अभियानातंर्गत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे प्रा.महेश रिंठे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.महेश रिठे व शाळेचे मुख्याध्यापक गजानन इंगळे यांची समायोचित भाषणे झाली. एकूणच शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक उत्साहात होते.