Breaking News

जेट एअरवेजमुळे एसबीआयच्या माजी अध्यक्षांवर जमीनीवर झोपण्याची वेळ


मुंबई, दि. 14, डिसेंबर - जेट एअरवेजचे विमान अचानक बाकू विमानतळावर उतरवल्यामुळे स्टेट बॅकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना संपूर्ण रात्र जमीनीवर झोपून काढावी लागली. जेट एअरवेजच्या मुंबई ते लंडन प्रवासादरम्यान विमानात धूर निघाल्याने विमान अजरबैजानच्या बाकू विमानतळावर उतरविण्यात आले. यामुळे भट्टाचार्यांसह अन्य प्रवाशांना 19 तास विमानतळावर ताटकळत रहावे लागले. 19 तासानंतर या प्रवाशांना दुसर्‍या विमानाने लंडनला पाठविण्यात आले.

अरुंधती भट्टाचार्य या ’बीए198’ या विमानाने मुंबईहून लंडनला जात होत्या. विमानात धूर आल्यानेे हे विमान तात्काळ बाकू विमानतळावर उतरविण्यात आले. मात्र पुढचे 19 तास या प्रवाशांची राहण्याची आणि खाण्याची कोणतीच व्यवस्था विमान कंपनीकडून करण्यात आली नाही. दरम्यान, जेट एअरवेजने झाल्याप्रकाराबाबत माफी मागितली असून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सर्वच प्रवाशांना त्रास झाल्याचे म्हटलेे आहे.