Breaking News

नियमांच्या सुलभीकरणामुळे पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत वाढ


नवी दिल्ली : नियमांचे सुलभीकरण आणि पासपोर्ट विस्तार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे 2016 च्या तुलनेत यावर्षी देशात पासपोर्ट आवेदकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.
जटील नियम आणि पोलीस पडताळणीची दीर्घ प्रक्रिया आदी कारणांमुळे देशात पासपोर्टसाठी आवेदन करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. मात्र, विदेश मंत्रालयाने गेल्या दीड वर्षात ‘नियमांचे सुलभीकरण’ आणि ‘पासपोर्ट विस्तार’ कार्यक्रमांतर्गत देशभरात नव्याने सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पासपोर्ट आवेदकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे श्री. मुळे म्हणाले.