Breaking News

ओखी चक्रीवादळ - घरांचे नुकसान, मच्छिमार समुद्रात बेपत्ता.


ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा बसून 13 जणांना मृत्यू झाला. अनेक ठिकाणी जोरदार वार्‍यामुळे वृक्ष उन्मळून पडले असून घरांचा याचा फटका बसलाय. तर काही मच्छिमार समुद्रात बेपत्ता आहेत. त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, 120 किमी वेगाने वारे वाहत असून ते लक्षद्वीप समूहाकडून अरबी समुद्राकडे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातही हायअलर्ट जारी करण्यात आलाय.