Breaking News

ओखी चक्रीवादळ - वार्‍याचा वेग वाढणार, मच्छिमारांना इशारा.


ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा बसत असून वार्‍याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता वेधशाळा आणि हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हवामान खात्यांने महाराष्ट्र-गोव्यात वादळ धडकण्याची शक्यता वर्तविली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्याने दक्षिण भारतात 13 जणांचा बळी गेले असून अनेक बेपत्ता आहेत.