तळोदा नगराध्यक्षपदी भाजपचे अजय परदेशी विजयी
दरम्यान, नगरसेवकपदाच्या 18 जागांपैकी भाजपने 11 जागांवर बाजी मारली असून काँग्रेसला 6 तर शिवसेनेला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागलेे. तळोदा येथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. त्यांनी पारदर्शक कारभार झाला नाही तर पालिका बरखास्तीचा इशाराही दिला होता. अखेर तळोद्यात परिवर्तन झाले व भाजपने काँग्रेसची सत्ता उधळून विजय प्राप्त केला आहे.