कमला मिल अग्नितांडव प्रकरणी दोघांना अटक व जामीन
मुंबई : कमला मिल अग्नितांडव प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. राकेश आणि आदित्य सिंघवी या दोघांना मुंबई पोलिसांनी केली, व त्यांची जामिनावर सुटका देखील झाली. ‘वन अबाव’चे मालक हितेश आणि जिगरचे काका या आरोपींना पळून जाण्यास मदत केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
मुंबईच्या कमला मिल परिसरातल्या, मोजोस आणि वन-अबव्ह रेस्टारंटला 28 डिसेंबरच्या रात्री आग लागली. या आगीत जळून खाक झालेल्या वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 304 कलमांतर्गंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे. या आगीत 14 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. या दुर्घटनेनंतर कमला मिलमधल्या बेकायदा बांधकामांवर पालिकेचे लक्ष गेले.