मनपा हद्दीत वीज बिल कमी केल्याने दिवसाही विजेचा तुटवडा नसल्याचे चित्र
अहमदनगर/प्रतिनिधी। गेल्या आठवड्यामध्ये विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नाने शहरातील विज बिल कमी झाले असल्याने आता मनपाने दिवसाही दिवे लावण्यास सुरवात केली असल्याचे आज शहरातील सर्जेपुरा भागात पहावयास मिळाले आहे.
शहरातील सर्जेपुरा भागात दिवसाच पथदिवे लावल्याचे चित्र दिसत होते. आजु बाजुला काम सुरु असलेल असे वाटले होते मात्र तसे कोठेच काम सुरु नसल्याने आता मनपाला बिलात सुट दिल्याने दिवसात दिवे लावण्याचा मनपाने घाट तर घतला नाही ना अशीच चर्चा या भागात रंगलेली होती.
मागील आठवड्यात महानगरपलिकेचे विज वितरण कंपनीने तब्बल 95 लाख रुपये कमी केले असुन नवीन मिटर बदलण्याच्या हालचाली सध्या शहरातील विविध ठिकाणी सुरवु असताना सर्जेपुरा भागात दिवसाच विज सुरु असल्याने महानगपालिकेचा कारभार म्हणजे असल्यावर दिवाळी आणि नसल्यावर शिमगा अशीच आहे. सर्जेपुरा भागात दिवसा विज सुरु असल्याने आता महानगरपालिका विद्युत विभाग येथील गलाथ कारभार करणार्यांवर कारवाई करणार का ?