Breaking News

३९९ ऑनलाईन सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून उपलब्ध


महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमअंतर्गत केलेल्या 399 ऑनलाईन सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
सदस्य सतीश चव्हाण यांनी नियम 93 अन्वये मांडलेल्या सूचनेवर श्री. चव्हाण म्हणाले की, प्रत्यक्षात महा-ई सेवा केंद्रापेक्षा जास्त सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देण्यात येतात. या दोन्ही केंद्रातून 7/12 दाखला, 8-अ फेरफार उतारा, वीज देयक, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला, शिधापत्रिका, निवासी दाखला, जाती प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला आदी सेवा नागरिकांना देण्यात येतात.

महा-ई सेवा केंद्रे ही 'आपले सरकार सेवा केंद्र' या common branding अंतर्गत कार्यरत असून याअंतर्गत सेवा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे ही केंद्रे बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. तसेच खाजगी डिजीटल सर्विस सेंटर सुरू करण्याचा शासनाचा विचार अथवा मानस नसल्याचे श्री.चव्हाण यांनी निवेदनाद्वारे सांगितले.