Breaking News

कुर्‍हाडीने चौघांवर प्राणघातक हल्ला

सोलापूर, दि. 12, डिसेंबर - रामवाडी परिसरात राहणार्‍या मित्राला सोडण्यासाठी गेल्यानंतर चौघांनी मिळून चार तरूणांवर तलवार, कुर्‍हाड, सळईने प्राणघातक हल्ला केला. तसेच, 2300 रुपये दोन मोबाईल काढून घेतले. ही घटना रविवारी मध्यरात्री एकच्या सुमाराला घडली. सलगरवस्ती पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अविनाश बाबूराव बिराजदार (वय 38, रा. सैफुल), राहुल धावड (रा. आदित्यनगर), ईरण्णा नुला (रा. रामवाडी), गुरुनाथ पांढरे (रा. दोन नंबर झोपडपट्टी, सोलापूर ) हे चौघे जखमी आहेत.



चौघांसह आणखी काही मित्र एकत्रित रात्री जेवायला गेले होते. जेवणानंतर एका मित्राला रामवाडी परिसरात सोडण्यासाठी वरील चौघेजण दुचाकी ओमिनी कारमधून (एम एच 13, एन 9326) रामवाडी दवाखान्यासमोरून मध्यरात्री एकच्या सुमारास जात होते. चारचाकीमध्ये बिराजदार धावड तर दुचाकीवर नुला आणि पांढरे होते. चौकात आल्यानंतर चौघेजण तरुण जवळ आले तुम्ही कुठले, कुठल्या पक्षाचे असे विचारून शिवीगाळ सुरू केली. थेट मारहाण करू लागले. तलवार, कुर्‍हाड रॉडने वार करण्यात आले.