Breaking News

शहर इलाखा शाखा अभियंत्यांचा न्यायालयाच्या भंगार मालमत्तेवरही डल्ला

मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा शाखेचा मनोरा आमदार निवास इमारतीचा कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार चर्चेत असतानाच याच साबां विभागातील शाखा अभियंता व्हि .एस.बापट यांनी उच्च न्यायालय सेवाकेंद्र येथील ऐंशी लाखाचे भंगार चोरून विकल्याचा आरोप आ.चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे. या आरोपाच्या समर्थनार्थ आ. वाघमारे यांनी पुरावे दिले आहेत. दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर साबांतील भ्रष्ट प्रवृत्ती न्यायमंदीरासारखे पवित्र ठिकाणही सोडले नसल्याने या मंडळींची नीतीमुल्य किती हिन दर्जाचे आहेत हे सिध्द झाल्याची चर्चा सुरू आहे.


मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामात कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर शहर इलाखा सोबत अवघ्या साबांची इभ्रत चव्हाट्यावर आली. हे कमी झाले म्हणून की काय शहर इलाखा शाखेचे शाखा अभियंता व्हि.एस बापट यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उच्च न्यायालय सेवाकेंद्राचे ऐंशी लाखाचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणाची कुणकुण आ.चरण भाऊ वाघमारे यांना लागल्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे वास्तव समोर आले. 

संबंधित शाखा अभियंत्याने 11फेब्रूवारी ते 12फेब्रूवारी 2017 हे दोन सुट्टीचे दिवस हेरून संधी साधल्याचे आतापर्यंतच्या माहीतीवरून निष्पन्न झाले आहे. शहर इलाखा शाखेच्या कार्यकारी अभियंत्यांपासून  शाखा अभियंत्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे जीवाणू वळवळ करीत असल्याचे अनेक प्रकरणांमधून उघड झाले आसतांना थेट न्यायमंदीराच्या आवारातच या प्रवृत्तींनी हात मारल्याचे उघड झाल्याने साबांची उरली सुरली इभ्रतही  गेट वे आफ इंडीयाच्या वेशीवर टांगली गेली आहे.(क्रमशाः)