मदन पाटील स्मारक समाधी कामात एक कोटी रुपयांचा घोटाळा
सांगली, दि. 21, डिसेंबर - सांगली महापालिकेतील काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या स्मारक व समाधीस्थळ येथील कामात त्यांच्याच जवळच्यांनी सुमारे एक कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. अगदी मदन पाटील यांच्या पुतळ्यातही या बगलबच्च्यांनी टक्केवारी घेतली आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी केला.
ज्या नेत्याच्या नावे काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते महापालिकेत पदाधिकारी अथवा ठेकेदार झाले, त्यांनीच मदन पाटील यांच्या स्मारक व समाधीस्थळी केलेल्या कामात चांगलाच ‘हात’ मारला आहे. महापालिकेतील एका पदाधिका-याच्या निकृष्ट व भ्रष्ट कारभारामुळे मदन पाटील यांच्या पुतळ्याची ओळखच हरवली आहे. त्यामुळे स्मारक व समाधीस्थळी झालेल्या कामाची संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही नितीन शिंदे यांनी केली.