ट्रक अपघातात ६ ठार.
कानपूर : दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात ६ ठार व ९ जण जखमी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात घडली. कानपूरच्या घाटमपूर येथून हमीरपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकला दोन दुचाकींनी हूल दिल्यानंतर हा भीषण अपघात झाला.
या वेळी भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या वाळूच्या ट्रकला धडक दिल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी १० जणांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला.