Breaking News

मग अफझल गुरूला वंदन करणार का?

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी वंदे मातरम्वरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करीत 'आईला वंदन करणार नाही तर मग अफझल गुरूला वंदन करणार का?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. राजधानी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. वंदे मातरम्विषयी वाद उपस्थित केला जात आहे. 


वंदे मातरम् म्हणजे आई तुला नमन. यात काय अडचण आहे? जर आईला वंदन करणार नाही तर अफझल गुरूला वंदन करणार का? असे नायडू् म्हणाले. विहिंपचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.