Breaking News

जलयुक्त शिवार योजना, जिल्ह्यात 75 कोटींची कामे

सोलापूर, दि. 03, डिसेंबर - जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शासनाबरोबरच लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला. गेल्या दोन वर्षात पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील 1 हजार 421 गावांमध्ये 122 कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत, यामध्ये नाला खोलीकरण सरळीकरणचे 595 कि.मी. अंतराचे काम करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 269 कि.मी. नाला खोलीकरण रुंदीकरण सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. लोकसहभागातून एकूण 3 हजार 563 तर शासकीय योजनेतून 3 हजार 700 कामे क रण्यात आली आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 75 कोटी रुपयांचा वाटा आहे. 


मागील दोन वर्षात झालेल्या कामांवर खर्च झालेल्या निधीवर नजर टाकली असता शासनाच्या पुढे एक पाऊल पुढे टाकत लोकांनी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात सहभाग घेतला आहे. 39 कोटी रुपये शासकीय निधी खर्च करून 3700 कामे करण्यात आली तर लोकसहभागातून 122 कोटी रुपयांची 3 हजार 563 कामे करण्यात आली आहेत. 1 हजार 9 कि.मी.चे नाला खोलीकरण... पुणेविभागातील पाच जिल्ह्यात 1 हजार 9 कि.मी. नाला खोलीकरण सरळीकरणाचे कामे करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात 176, सातारा 275, सांगली जिल्ह्यात 232, सोलापूर जिल्ह्यात 268 तर कोल्हापूर जिल्ह्यात 41 कि.मी. कामाचा समावेश आहे. यामध्ये शासकीय निधीतून 413 कि.मी. तर लोकसभागातून 595 कि.मी.चे काम करण्यात आले आहे. 

385 घनमीटरचा झाला गाळ उपसा... शासनाने जलयुक्त शिवार अंतर्गत पाझर तलाव, मध्यम प्रकल्प यातून गाळ उपसण्यासाठी आवाहन केले होते. नागरिकांनी स्वखर्चातून गेल्या दोन वर्षात 294 घनमीटर तर शासकीय योजनेतून 91 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात 73 घनमीटर, सातारा जिल्ह्यात 46 घनमीटर, सांगली जिल्ह्यात 65 घनमीटर, सोलापूर जिल्ह्यात 100 घनमीटर तर कोल्हापूर जिल्ह्यात घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. फ