धुळ्यातील 10 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
धुळे, दि. 03, डिसेंबर - धुळ्यातील बहुचर्चित गुड्या हत्याकांडानंतर पोलिसांनी गुन्हेगारी थोपवण्यासाठी कंबर कसली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर दहा गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश रवींद्र सूर्यवंशी व बंटी उर्फ रामदास अण्णा गायकवाड (गुरूपपैय्या) तसेच मिलिंद राजेंद्र आवटे यांना दोन वर्षांसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
आझादनगर हद्दीतील पवन उर्फ भुर्याठ दिलीप वाघ व वसीम जैनोद्दीन शेख, पश्चिलम देवपूर ठाणे हद्दीतील सुनील रामू मरसाळे, देवपूर हद्दीतील विरेंद्र चंद्रभान अहिरे यांना एक वर्ष मुदतीसाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले. तसेच सहा महिन्यांसाठी देवपूर हद्दीतील शक्ती रमेश अकवारे, रवी पन्नालाल चत्रे व गोविंद मैकुलाल चित्ते यांना वरील जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून हद्दपार क रण्यात आले.