Breaking News

नंदुरबारमध्ये अपघात; 5 मजूर जागीच ठार


नंदुरबार, दि. 29, डिसेंबर - शहादा तालुक्यातील म्हसावद-आमोदा रस्त्यावर अ‍ॅपेरिक्षा आणि मालवाहतूक करणा-या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर 10 जणांची स्थिती गंभीर आहे. यांपैकी दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमीमध्ये आदिवासी कला पथकातील कलाकारांचाही समावेश आहे. जखमींवर शहादा आणि म्हसावद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.