Breaking News

14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली,पाच अधिकारी निलंबित.


मुंबई: कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.  जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली. तर मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी, धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर, महाले सब इंजिनिअर, पडगिरे- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी या पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.