Breaking News

राज्यात पारा घसरला, खानदेशात दोन बळी

नंदुरबार, दि. 29, डिसेंबर - वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा घसरला असून थंडीचा कडाका वाढला आहे. खानदेशातही वाढलेल्या थंडीने दोन जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात राजू दाजमल भिल (27), देवीसिंग वेडू ठाकरे (75) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही रस्त्यावर उघड्यावर झोपले होते. त्यामुळे थंडीने गारठून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. या मृत्यूची नोंद नंदुरबार तालुका पोलिसांत करण्यात आली आहे.