Breaking News

वाडा नगरपरिषद निवडणूक : शिवसेनेच्या गीतांजली कोलेकरांचा 3119 मतांनी विजय


पालघर, दि. 19, डिसेंबर - वाडा नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर यांनी 3119 मतांनी विजय मिळवला. तर निशा सावरा यांचा पराभव झाला आहे. निशा सावरा या आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या कन्या आहेत. वाडा नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये निशा सावरा यांना 2677 मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांना समसमान म्हणजे प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला दोन, बहुजन विकास आघाडीला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.