Breaking News

राजकीय वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, 15 जखमी

औरंगाबाद, दि. 30, डिसेंबर - राजकीय वैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत आजी - माजी सरपंचासह 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पाचोड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पैठण तालुक्यातील रांजनगाव दांडगा येथे ही घटना घडली आहे. 


या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या भागात काही अनूचित घटना घडू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात करण्यात आले आहे. रांजनगाव दांडागा येथील गावाची शासकीय पाणी पुरवठा तत्कालीन सरपंच अकील पटेल यांच्या कार्यकालात 2011 ला मंजूर होऊन पूर्ण झाली. परंतु सरपंच पटेल यांच्यावर 6 मार्च रोजी अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आल्याने त्यांना सरपंच पदावरुन हटविण्यात आले. यानंतर त्यांच्या जागेवर रियाज पटेल यांची वर्णी लागली. याकारणावरुन आजी - माजी सरपंचात राजकीय गटबाजीला सुरूवात झाली होती. मागील काही दिवसांपासून या दोन्ही गटांत वाद सुरू होते.