Breaking News

कल्याणमध्ये पत्रकाराची लूट, 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास

कल्याण, दि. 25, डिसेंंबर - कल्याण पश्‍चिमेकडे असलेल्या आर्चिस गॅलरीजवळ पत्रकार संदेश शिर्के यांची काही चोरट्यांनी लूट केली आहे. गाडी समोर काही तरी पडले असल्याचा बनाव करुन त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गाडीतील एक लाख रुपये व कॅमेरा असा 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. या प्रकरणी शिर्के यांनी  महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. 
शिर्के हे डॉटकॉम नावाचे स्थानिक चॅनल चालवितात. एअरटेल गॅलरीमध्ये ते पैसे भरुन आल्यानंतर हा प्रकार घडला. दरम्यान, चोरट्यांनी मागच्या डोरमधून मागच्या सिटवर असलेला व्हीडीओ कॅमेरा, दोन स्टिंग ऑपरेशनचे इम्पोर्टेड कॅमेरे आणि एक लाखाची रोकड असा एक लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे.