Breaking News

शंकर राऊत व पार्वती राऊतसह स्वतःच्या नोर्को टेस्टची भानुदास कोतकरांची मागणी.

दत्तात्रय शंकर राऊत मृत्यू प्रकरणी फिर्यादी शंकर राऊत व त्यांची पत्नी पार्वतीबाई राऊत यांच्यासह माझीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी अशोक लांडे खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भानुदास कोतकर यांनी न्यायालयाकडे केली आहे.


न्यायालयाला दिलेल्या अर्जात म्हंटलेे आहे की, दि.30-6-2001 रोजी शंकर राऊत यांनी आपला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि.1-7-2001 रोजी राऊत यांनी पुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची तक्रार दिली होती. 

शंकर राऊत यांनी सदरची केस हेतू पुरस्सरपणे खुनाच्या गुन्हयाकडे वळवली आहे. सदर गुन्हयाचा तपास सीआयडीकडे वळविण्यात आला आहे. वास्तविक राऊत आणि माझा काहीही संबंध नसू सूड जागवण्यासाठी मला यात गोवण्यात आले आहे. 

त्यामुळे फिर्यादी शंकर राऊत व त्यांची पत्नी पार्वतीबाई राऊत यांची नार्को टेस्ट कायद्याच्या हितासाठी घेणे आवश्यक आहे. त्यांच्याबरोबर माझीही नार्को टेस्ट न्यायालयासमोर अविा निवृत्त न्यायाधिश किंवा आयपीएस अधिकार्‍यासमोर घेण्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी कोतकर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा