थकबाकीमुळे महावितरणचा महापालिकेला पुन्हा ‘शॉक’
महपालिकेचा नियोजनपुर्ण कारभार आता चव्हाट्यावर आला असून शहरातील नागरीकांना आता विविध कर भरुनही सुविधा मिळत नसल्याने नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. महापालिकेची अवस्था सध्या बिकट झाली असून आश्वासनांची खैरातच केली जात असल्याचे दिसत आहे.
केवळ पथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी सुमारे 8 ते 9 कोटीपर्यंत गेली आहे. थकबाकी तर सोडाच दर महिन्याचे नियमित वीजबिलही महापलिकाकडून भरली जात नाहीत. तसेच महापालिकेला महावितरणने नोटीसा दिल्या आहेत. त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने अंधाराची परस्थितीला विनाकारण नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे.
आता मनपा हद्दीतील वीज महावितरणने तोडण्यावर टप्प्या टप्पयाने भर दिला आहे. यातुन नागरिकांनी भरलेले रक्कम नेमके जाते कोठे असाच काहीसा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे. शहरातील पथदिवे बंद केल्याने आता नागरीकांचे मोठे हाल होत असून महापालिकेचा सुरु असलेला गलथान कारभार जनतेसमोर आला आहे.
पाणी जोडले तर पथदिव्याची वीज तोडली
गुरवारी शहरातील पाणी पुरवठा महाविरण कंपनीने सकाळी तोडला आणि त्यानंतर अधिकार्यांच्या आणि नेत्यांच्या बैठकीनंतर चर्चा करुन तो पुन्हा जोडला मात्र शुक्रवारी पुन्हा महापालिकेची पथदिव्यांची वीज तोडली आहे. या प्रकारामुळे नाहक नागरीकांना त्रास सहन करावा लागत असून शहरातील अनेक रस्ते आंधामय झाले आहे. मनाचा कारभार कार्यशुन्य असल्याने आता नागरीक कर भराचया का नाही असाच विचार करत असल्याचे पुढे आले आहे.
अंधेरा कायम है । श्वानांची भिती कायम
शहरात सध्या महापालिकेने पथदिव्यांचे वीजबिल थकवल्याने वीज तोडण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्ते खड्डेमय असले तरी आता खड्डेमय आणि अंधरमय रस्ते झाले आहे. शहरात संध्या अंधाराचे राज्य असून श्वानांचा त्रास ही कायम आहे. यातुन आता मनपा काय करत आहे हाच प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने काल पाणी पुरवठ्याची वीज तोडली यानंतर चर्चा होवूनही लगेच दुसर्या दिवशी महावितरणने पुन्हा मनपाला पथदिव्याची वीज कट करुन शॉकच दिला आहे. यातच आता श्वानाचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहे.