Breaking News

टीडीआर घोटाळ्याचा आरोप निराधार आणि महापालिकेची बदनामी करणारा

ठाणे, दि. 24, नोव्हेंबर - तीन हात नाका येथील वंदना सोसायटी बाबतीत 200 कोटीचा टीडीआर घोटाळ्याबाबत करण्यात आलेले आरोप हे निराधार, बिनबुडाचे आणि महापा लिकेची बदनामी करणारे असून संबंधिताविरूद्ध कायदेशीर बाबींची पूर्तता करुन मानहानीचा दावा करण्यात येणार आहे.



तीन हात नाका येथील वंदना सोसायटी बाबतीत बेकायदा पद्धतीने शहर विकास विभागाने टीडीआर देवून 200 कोटीचा टीडीआर घोटाळा केल्याचा आरोप संजय घाडीगावकर यांनी केला होता. प्रत्यक्षात 7927.62 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा जास्त टीडीआर वापरण्यात आलेला नाही किंवा ठाणे महानगरपालिकेने टीडीआर नकाशे मंजूर केलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 

त्याचप्रमाणे टीडीआर पोटेन्शियल वापरण्यासाठी विकत घेवून वापरण्यासाठी मंजूरी घेणे आवश्यक असल्याने 200 कोटी रूपये किंमतीचा टीडीआर वापरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे हा आरोप बिनबुडाचा आणि महापालिकेची बदनामी करणारा आहे.

वंदना को ऑप हौसिंग सोसायटीचा वास्तुविशारद मे. 10 फोल्डस यांनी अंतीम भूखंड क्र. 208 वरील पुनर्बांधनीचा प्रस्ताव दिनांक 30 जून 2016 रोजी महापालकेस दाखल के ला आहे. या दाखल केलल्या प्रस्तावाबाबत दिनांक 23 ऑगस्ट 2016 रोजी हरकत घेण्यात आली होती. सदर हरकतीची (उपविभागणीबाबत) संबंधितांची सुनावणी घेवून ती तक्रार निकाली काढण्यात आली होती.

सदर पुनर्बांधनीच्या प्रस्तावास महापालिकेने 23 ऑगस्ट रोजी तत्वतः मान्यता दिली होती. या प्रस्तावाअंतर्गत भूखंडाचे एकूण क्षेत्र 6490.43 चौ. मी. विचारात घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सदर प्रस्तावाअंतर्गतचा भूखंड एमआरटीएस च्या आरक्षणाने बाधित असल्याने त्याचे नियमावलीच्या तरतुदीनुसार 407.04 चौ. मी. क्षेत्र तसेच त्यावरील अ धिमूल्य आकारून अनुज्ञेय असलेला 1257.38 चौ. मी. भूनिर्देशांक याप्रमाणे एकूण 7927.62 चौ. मी. बांधकाम क्षेत्र मंजूर करण्यात आलेले आहे. 

त्याचबरोबर या प्रस्तावातंर्गत बेसिक झोनल भूनिर्देशांक अधिक अनुज्ञेय प्रमियम एफएसआय अधिक आरक्षणाचा डीआर यानुसार एकून अनुज्ञेय भूनिर्देशांक 7951.33 इतका असून त्या अनुज्ञेय भूनिर्देशांकाच्या मर्यादेतच प्रस्तावित बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान विकास हस्तातंरणीय हक्काबाबत शासनाने 29 जानेवारी 2016 व 2 मे 2016 रोजी पारित केलेल्या अधिसुचनेतील तरतुदीनुसार रस्त्याच्या रूंदीप्रमाणे टीडीआर पोटेन्शिएल अनुज्ञेय करण्यात आलेले आहे. तसेच प्रस्तावातंर्गतचा भूखंड हा सेवा रस्ता व पुर्व द्रुतगती महामार्ग यांना लागून असल्याने रस्त्याची एकूण रूंदी विचारात घेवून सदर प्रस्तावातंर्गत दिनांक 23-12-2016 रोजीच्या तत्वतः मान्यतेनुसार दिनांक 28-2-2017 बांधकाम आराखडे मंजूर करण्यात आले. 

तथापि सदर प्रस्तावातंर्गत पोटेन्शियल टीडीआर केवळ मंजूर नकाशामध्ये दर्शविण्यात आलेला आहे. मात्र सदर प्रस्तावातंर्गत बांधकाम परवानगी ही केवळ 7927.62 चौ. मी. एवढ्या क्षेत्रासाठीच देण्यात आलेली असून टीडीआर वापरण्यात आलेला नाही किंवा महापालिकेने टीडीआर नकाशेही मंजूर केलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर टीडीआर पोटेन्शियल वापरण्यासाठी टीडीआर विकत घेवून वापरण्यासाठी मंजूरी घेणे आवश्यक आहे. 

ती मंजूरी देण्यात आलेली नसल्याने 200 कोटी रूपये किंमतीचा टीडीआर वापरण्यास मंजूरी दिलेली आहे हा आरोप बिनबुडाचा आहे. त्याचबरोबर टीडीआर पोटेन्शियल जरी नमुद क रण्यात आले असले तरी शासनाच्या 29-12-2016 रोजी स्पष्टीकरणापूर्वी या प्रस्तावाअंतर्गत 1 चौ. मी. चाही टीडीआर वापरण्यासाठी विकासकाकडून अर्ज आलेला नाही किंवा महापालिकेनेही मंजूर केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.