Breaking News

कोल्हापुरात बसला लागलेल्या आगीत दोन प्रवाशांचा मृत्यू

कोल्हापूर येथील गगनबावडा मार्गावरील लोंघे गावातून गोव्यावरुन कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला जाणा-या आत्माराम ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला आज पहाटे 4.30 च्या सुमारास अचानक आग लागली. यात दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बंटी भट आणि विकी भट अशी मृतांची नावे असून ते पुण्यातील रहिवाशी होते. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेत बसही जळून खाक झाली आहे.


एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच बसच्या चालकाने सर्व प्रवाशांना खेचून बाहेर काढले. यामुळे बाहेर येताना काही जण जखमी झाले आहेत. मात्र दोन जणांचा यात होरपळून मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.