Breaking News

गर्भवती महिलांना मिळणार 5 हजार रुपये

सिंधुदुर्गनगरी, दि. 24, नोव्हेंबर - आपल्याकडे जर आनंदाची बातमी असेल आणि आपल्या घरात पहिल्यांदाच पाळणा हलणार असेल तर आपल्या आनंदात शासनसुद्धा सामील आहे. देशात माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, आई आणि बाळ सुदृढ़ निरोगी असावे या दृष्टीने सरकारने एक नवे पाऊल उचलले असून शासनान पंतप्रधान मातृ वंदन योजना सुरु केली आहे. 


या योजनेन्तर्गत गर्भवती महिलेला पहिल्या अपत्यासाठी 5 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ सर्वच वर्गातील महिलांना घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे दिली. गर्भवती महिलांनी बाळाच्या पोषणासाठी स्वतःची काळजी घ्यावी, सततचा अगर घ्यावा, माता आणि बालमृत्यू दाराचे प्रमाण कमी करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरु क रण्यात आली आहे. यासाठी वय, जात, उत्पन्न अशी कोणतीही अट नाही. याबाबतची नोंदणी आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत करणे बंधनकारक आहे.
 
गर्भधारणेपासून 150 दिवसांच्या आत माता व बाल संरक्षण पत्रावर याची नोंद केल्यास नोंदणीवेळी एक हजार रुपये दिले जाणार आहेत. गरोदरपणाला सहा महिने पूर्ण होताच दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रसूती पश्‍चात बालकाची जन्मनोंद आणि पेटेव्हेलंटचा तिसरा डोस दिल्यावर उर्वरित दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेंतर्गतची रक्कम संबधित लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे आधार कार्डची नोंद असलेला बँक पास बुक नंबर नोंदणीवेळी नमूद करणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा