Breaking News

चित्रपटाला अनेक आयाम असल्यामुळे ते समजून घेतले पाहिजे.

नाशिक, दि. 24, नोव्हेंबर - चित्रपट हा वर्तुळाच्या परिघासारखा असतो. तो सुरु होतो, मध्यावर जातो. जिथे उत्कंठा असते आणि मग तिच शिगेला पोहोचते. तिथेच शेवट होतो. आणि तेव्हाच त्यातील उत्कंठा कमी होते. हाच करमणूकप्रधान चित्रपट असून तो आपल्याला सर्वाना आवडतो. 


मात्र अनेकदा चित्रपट असा नसतो. चित्रपटाला अनेक आयाम असतात. ते आपण समजून घेतले पाहिजे, असे मत सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश इंगळे, हैदराबाद युनिव्हर्सिटी, फिल्म स्टडीज, इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लॅग्वेज युनिवर्सिटी यांनी व्यक्त केले आहे. शहरातील कुसुमाग्रज स्मारकात विशाखा आणि स्वगत हॉलमध्ये 6 वा अंकुर फिल्म फेस्टीव्हल सुरु आहे. फेस्टीव्हलच्या दुसर्‍या दिवशी फिल्मसच्या सादरीक रणासह ‘फिल्म अ‍ॅप्रिसेशन’ अ‍ॅप्रीसिएशन अर्थात चित्रपट रसग्रहण कसा करावा यावर ऋषिकेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले.

मराठीत गाजलेल्या ‘सैराट’ सिनेमा जेव्हा सुरु होतो तेव्हा स्क्रिनवर चित्र नसते. जवळपास एक मिनिटे फक्त आवाज असतो आणि आपल्याला कळून चुकते की चित्रपट सुरु झाला आहे. त्यामुळे चित्रपट हा जरी अनेक हलणार्‍या चित्रांनी अर्थात व्हिज्युअल फ्रेमने तयार झाला असला तरी यामध्ये अनके अंगे आहेत. त्या सगळयांचा उपयोग करत चित्रपट पूर्ण होतो असतो असे मत इंगळे यांनी व्यक्त केले. लोकप्रिय ‘शोले’ चित्रपट आजही सर्वाना आवडतो. जेव्हा चित्रपट सुरु होतो तेव्हा एक रेल्वेचा सीन आहे. 

हा सीन चित्रपटाला अनुसरून जरी असला तरी त्यात नाविन्य नाही. मात्र तो रेल्वेचा ओपनिंग सीन आपल्याला खूप भावून करून जातो. कारण आपल्या मनात ते चित्र पक्के आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते सुद्धा आपल्या याच वास्तववादी विचार सरणीला लक्षात ठेवतात आणि सीन तयार केले जातात. त्यामुळे ते आपल्याला आवडतात असे इंगळे यांनी स्पष्ट केले.
काही चित्रपट हे फक्त दृश्य दाखवतात त्यात स्टोरी नसते. जसे अब्बास करोस्तोमी या दिग्दर्शकाने जपानी दिग्दर्शक ओझे याला आदरांजली दिली आहे. त्याने समुद्र दाखवला असून तो विविध अशा पाच फ्रेम मधून दाखवला आहे. या चित्रपटाचे नाव ‘डेडीकेटेड टू ओझू’ असे आहे.

 मात्र यात कोणताही विषय नाही. तर उलट भारतीय थोर दिग्दर्शक सत्यजित रे यांचा पाथेर पांचाली हा चित्रपट आधी कागदावर चित्र तयार करून पूर्ण झाला. मग त्याचे शुटींग केले होते. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम इतकी वास्तवादी होती की आजही या चित्रपटावर अनेक संशोधन आणि अभ्यास करत आहेत असे चित्रपट कसा असतो यावर इंगळे यांनी मत व्यक्त केले आहे. 

आपल्याला जे दृश्य स्वरूपात माहित असते ते आपण चित्रपटात पाहतो. मात्र अनेकदा अनेक दिग्दर्शक हे चक्र मोडतात आणि शेवट आधी तर सुरवात शेवटी दाखवतात त्यामुळे रूढ अर्थाने समोर येत असलेल्या चित्रपट थाटणीला ते छेद देतात. त्यामुळे रसिकाला धक्का बसतो असे इंगळे स्पष्ट करतात. इंगळे यांनी पुढे संगितले की, चित्रपट पाहतांना फक्त हालणारे चित्र नाही तर त्यातील आवाज आणि इतर गोष्टी मोठा प्रभाव पडतात.

सिनेमा तयार करतांना सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती अर्थात कॅमेरा आहे. त्याचा आधी ऑब्जेक्ट शूट केला जातो. त्यानंतर कॅमेरा वेगवेगळ्या हालचालीतून अनेक सीन शूट केले जातात. त्यामुळे चित्रपटाला एक जिवंतपणा येतो. तो फक्त त्या फ्रेम पुरता असला तरी ही प्रेक्षकाला खरा वाटतो असे त्यांनी सांगितले.