भिवंडीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरू
भिवंडी, दि. 24, नोव्हेंबर - येथील नवी वस्ती भागातील चार मजली इमारत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ताहिर बिजनौरी असे मृत मुलीचे नाव आहे. तर, 5 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश मिळाले आहे. ढिगा-याखाली आणखी 17 जण अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. येथील परिसरातील रस्ता लहान असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दोन पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला लवकरात लवकर पोहोचता यावे, याकरिता ग्रीन कॉरिडोअर तयार करण्यात आले आहे.