Breaking News

योगी आदित्यनाथ यांच्या सभेदरम्यान महिलेस बुरखा काढण्यास सांगितले !


उत्तर प्रदेशच्या बलियात आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेला योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी संबोधित केले. या सभेदरम्यान पोलिसांनी कथितरीत्या एका मुस्लिम महिलेला सर्वांसमोर बुरखा काढण्यास बाध्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेदरम्यान पोलिसांनी कथितरीत्या एका मुस्लिम महिलेला बुरखा काढण्यास बाध्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व पोलिसांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, असे जिल्हाधिकारी सुरेंद्र विक्रम यांनी सांगितले. सिटी मॅजिस्ट्रेट याचा तपास करतील असे ते म्हणाले. अहवाल मिळाल्यानंतर दोषींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. पोलीस अधीक्षक अनिल कुमार यांनीही या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. 


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा