ट्विन टॉवरच्या नुकसानीपोटी एअरलाईन्सकडून ६१६ कोटींची भरपाई!
लॅरी सिल्वरस्टीन या कंपनीच्या मालकीच्या असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या मालमत्तेचे नुकसान विमा कंपन्यांकडून अदा केले जाईल, असेही न्यायालयीन कागदपत्रांत म्हटले आहे. ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या दीड महिना अगोदरच सिल्वरस्टीनने संबंधित जमीन न्यूयॉर्क व न्यूजर्सी पोर्ट ॲथॉरिटीकडून ९९ वर्षांच्या लीजवर घेतली होती.
हल्ल्यानंतर ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्यावर सिल्वरस्टीनला त्यांच्या विमा पुरवठादारांकडून ४.५५ अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई मिळाली होती. यासाठीही सिल्वरस्टीनला कैक वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागला होता. याशिवाय ट्विट टॉवरच्या नुकसानीसाठी जबाबदार ठरलेल्या अमेरिकन व युनायटेड एअरलाईन्सविरोधातही सिल्वरस्टीनने नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता.