अखेर ॲपल आणणार आयफोन ड्युएल सिम फोन !
पुढील वर्षी येणारा नवीन आयफोन ड्युएल सिम फोन आणणार आहे. ॲपल पुढील वर्षी तीन मॉडेल आणणार असून यामधील सर्व आयफोन ड्युएल सिमचे असणार आहे.केजीआय सिक्युरिटीज या तैवानमधील अग्रगण्य कंपनीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध तज्ज्ञ मिंग-ची कुओ यांच्या अहवालामध्ये २०१८ पासून येणाऱ्या सर्व आयफोनच्या मॉडेलमध्ये ड्युएल सिम सपोर्ट असल्याचे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे या आयफोनमधील दोन्ही सिम स्लॉट हे 'एलटीई' प्रकारातील असणार आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व ड्युएल सिम फोन हे 'एलटीई' आणि 'थ्रीजी' प्रकारातले आहेत. २०१८ मध्ये बाजारात येणाऱ्या आयफोनमध्ये एलटीई ट्रान्समिशन स्पीडबरोबरच ड्युएल स्टॅण्डबाय फिचरही उपलब्ध होणार आहे.
एलटीई-थ्री जीऐवजी या फोनमध्ये एलटीई-एलटीई तंत्रज्ञान असणार आहे, असा उल्लेख कुवोंनी त्यांच्या लेखात केला आहे. एलटीई तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲपलचे कनेक्टिव्हीटी फिचर्स आणखीनच मजबूत होतील. २०१८ मध्ये आयफोन बेसब्रॅण्ड म्हणजे साध्या प्रकाराच्या चीपचा उपयोग करण्याऐवजी इंटेल एसएमएम ७५६० आणि क्वॉलकॉम एसडीएक्स २०चा वापर करणार आहे.