शेतक-याने भाकरीत विष घातल्याने कुटुंबातील दोघींचा मृत्यू; तिघे गंभीर
निंबायती-न्हावी तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी राजू रतन राठोड हा शेतकरी राहत असून त्याला पत्नी दोन मुली व दोन मुले आहेत. त्याला 5 एकर शेती आहे. या हंगामात त्याने शेतात घेतलेल्या कापसाला योग्य उतारा मिळाला नसल्याने पुढील हंगामात पिक घेण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नव्हते. तसेच त्याचे नाव कर्जमाफीच्या योजनेतही नव्हते. त्यामुळे तो निराश झाला होता.
राठोड यांची पत्नी कावेरीबाई हिने भाक-या केल्या होत्या. सगळेजण जेवायला बसले असताना राजू राठोड न जेवताच बाहेर गेला. रात्री झोपण्याच्या वेळेस कावेरीबाई (वय 32), मुलगी ज्योती (13) व गोगली (8), मुलगा राहुल (10) व दिनेश (10) यांना उलट्या होऊ लागल्या म्हणून त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान मुलगी ज्योती व गोगली मरण पावल्या. तर राहुल व दिनेश आणि कावेरीबाई या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. राठोड दुपार पर्यंत गायब होता. पोलीस त्याच्या शोधात होते. दरम्यान आज दुपारी त्याला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा