सेक्स स्कॅडल प्रकरणी सहा जणांना 10 वर्षे कारावास
औरंगाबाद, दि. 23, नोव्हेंबर - पाथरीच्या माजी आमदारांच्या पतीसह सहा दोषींना परभणीमध्ये 1994 साली झालेल्या सेक्स स्कॅण्डल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सत्र न्यायालयाने सुनावलेली प्रत्येकी 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली.
परभणी येथे 1994 साली तीन दिवसांत सोळा आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. या बाबत खंडपीठात खटला चालु होता. त्याचा निकाल लागला असून शिवसेनेच्या पाथरी विधानसभा मतदार संघाच्या माजी आ़ मीराताई रेंगे यांचे पती कल्याण रेंगे, रामेश्वर कानडे, रेल्वे कर्मचारी भानसिंग बुंदेले, तत्कालीन नगरसेवक मुन्ना परिहार, राजू महालगे आणि महेश मोताफळे यांची शिक्षा खंडीपठाने कायम केली.

सदर दोन मुली ग्रामीण भागातून परभणीला पळून आल्या होत्या. तेंव्हा त्यांना तीन दिवस लॉजवर डांबून ठेवून त्यांच्यावर दहा बारा जणांनी बलात्कार केला होता. यातील चार आरोपी शिक्षेआधीच मरण पावले आहेत. तर उर्वरित आरोपींना काल शिक्षा झाली. मीराताई रेगे या 2009 ते 2014 मध्ये आमदार होत्या.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा