11 महिन्यात मराठवाड्यात 847 शेतक-यांच्या आत्महत्या
औरंगाबाद, दि. 23, नोव्हेंबर - या वर्षात जानेवारीपासून मराठवाड्यातील तब्बल 847 शेतकर्यांनी कर्ज बाजारीपणामुळे आतमहत्या केल्या आहेत. यापैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक 175 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टी, दुष्काळाने मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्न नसल्याने शेतकर्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. जिल्हाश: आत्महत्यांचीं संख्या पुढीलप्रमाणे नांदेड-132, औरंगाबाद- 114, परभणी व उस्मानाबाद- 112, लातूर- 84, जालना- 73, हिंगोली जिल्ह्यात-45 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यापैकी 594 आत्महत्येची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरले असून 162 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. 91 प्रकरणांची चौकशी सुरु असल्याने प्रलंबित आहेत. आतापयरत 5 कोटी 94 लाख रुपयांची मदत शेतकरी कुटुंबांना देण्यात आली आहे.